Wednesday, 24 February 2016

Current Affairs of 24 February 2016 For MPSC Exams

डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे
जगातील सर्वांत सुंदर शहर ठरले आहे.
तसेच या शहरातील उच्च प्रतीचे
राहणीमान सर्व जगात चांगले असल्याचे
एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
मर्सर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून
विविध कंपन्या, संस्था आणि
नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या
आधारावर त्यांनी जगातील 230 शहरांचा
अभ्यास केला.
तसेच यादी तयार करताना या संस्थेने
राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण,
गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक
निकष लावले.

व्हिएन्ना शहराची लोकसंख्या 17 लाख
असून, शहरात असलेली विविध संग्रहालये,
रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद
हे नागरिक घेत असतात.
इतर पाश्चात्य देशांतील शहरांची तुलना
करता येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच
स्वस्त आहे.
एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र
असलेले बगदाद दहशतवादाने होरपळल्याने
या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.

भारतीय कलाकाराला फ्रान्सचा
नाइटहूड सन्मान :
•आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल
एका भारतीय वंशाच्या कलाकाराला
फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन
त्याचा सन्मान केला आहे.
•दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल
महंमद यांचा फ्रेंच राजदूताने 'नाइट ऑफ द
ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर' हा किताब
दिला.
•फ्रान्सने केलेल्या सन्मानाबद्दल इस्माईल
यांनी आभार मानले असून, कलेची
राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसनेच
हा गौरव केल्याची भावना व्यक्त केली
आहे.
•फ्रान्स सरकारकडून 1957 पासून हा
किताब दिला जात आहे.
कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या
संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या
कलाकारांना हा किताब दिला जातो.
•अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करत
असलेल्या इस्माईल महंमद यांना आधीही
अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ते

नाट्यलेखकही आहेत.

SHARE THIS

Author:

0 comments: