Social Share


Wednesday, 24 February 2016

वय (वयवारी)

वय (वयवारी)

प्रकार पहिला :-

1).अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा
आहे. 5 वर्षापूर्वी अश्विनचे वय 11 वर्षे होते ;
तर 5 वर्षांनंतर अश्विन व राणी यांच्या
वयातील फरक किती?
1. 15 वर्षे
2. 10 वर्षे
3. 5 वर्षे
4. 20 वर्षे
उत्तर : 5 वर्षे
स्पष्टीकरण :- वय वाढले तरी दोघांच्या वयांतील फरक
तेवढाच राहतो. अश्विन राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा म्हणजे

फरक 5 वर्षेच राहील.

2).जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी
लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 49
वर्षे असल्यास जान्हवीच्या आईचे वय
किती ?
1. 11 वर्षे
2. 36 वर्षे
3. 34 वर्षे
4. 38 वर्षे
उत्तर : 38 वर्षे
क्लृप्ती :-दोन संख्यांपैकी मोठी संख्या = (दोन
संख्यांची बेरीज+दोन संख्यातील फरक)÷2(49+27) ÷ 2 = 38
लहान संख्या = (दोन संख्यांची बेरीज – दोन संख्यांतील फरक) ÷ 2 (49-27) ÷ 2 = 11

3).रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे.
दोघांच्या वयांतील फरक 16 वर्षे असल्यास;
त्या दोघांच्या वयांची बेरीज किती?
1. 24 वर्षे
2. 32 वर्षे
3. 40 वर्षे
4. 48 वर्षे
उत्तर : 32 वर्षे
स्पष्टीकरण :-राम व हरीच्या वयांचे प्रमाण = 3x : x
दोघांच्या वयांची बेरीज = 3x + x = 4x
फरक = 3 x – x = 2x =16,
:: x=8
:: 4x = 4×8 = 32




New MPSC ASST. पूर्व परीक्षा प्रश्नसंच

New MPSC ASST. पूर्व परीक्षा प्रश्नसंच

आम्ही या ठिकाणी MPSC ASST 2014 Pre.
परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे
Source देण्याचा प्रयत्न केला आहे. हे Source
आणि आयोगाचे source एकच आहे असे आमचे
म्हणणे अजिबात नाही.जर तसे झाले तर तो एक
योगायोग आहे.येथे देण्यात येणारे प्रत्येक
reference विद्यार्त्यांना केवळ प्रश्नाचे उत्तरे
कोठे शोधावी हे सुचवतात.अमुक प्रश्न याच
पुस्तकातून आला असा कोणताही दावा
आम्ही करत नाही, वा त्या पुस्तकाचे समर्थन
पण करत नाही.काही प्रश्नांचे source
वेळेअभावी दिलेले नाही, लवकरच ते पण
प्रसिद्ध होतील, आपणास माहित झाल्यास
प्रश्न क्रमांका सोबत सेट C प्रमाणे पोस्ट
करावे.
Download Paper ASST 2014 Pre. paper
analysis Click Here
Current Affairs of 24 February 2016 For MPSC Exams

Current Affairs of 24 February 2016 For MPSC Exams

डॅन्युब नदीच्या तीरावर वसलेली
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे
जगातील सर्वांत सुंदर शहर ठरले आहे.
तसेच या शहरातील उच्च प्रतीचे
राहणीमान सर्व जगात चांगले असल्याचे
एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.
मर्सर या संस्थेने हे सर्वेक्षण केले असून
विविध कंपन्या, संस्था आणि
नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या
आधारावर त्यांनी जगातील 230 शहरांचा
अभ्यास केला.
तसेच यादी तयार करताना या संस्थेने
राजकीय स्थैर्य, आरोग्यसुविधा, शिक्षण,
गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्था असे अनेक
निकष लावले.

व्हिएन्ना शहराची लोकसंख्या 17 लाख
असून, शहरात असलेली विविध संग्रहालये,
रंगभूमी, ऑपेरा आणि कॅफे संस्कृतीचा आनंद
हे नागरिक घेत असतात.
इतर पाश्चात्य देशांतील शहरांची तुलना
करता येथील सार्वजनिक वाहतूकही बरीच
स्वस्त आहे.
एकेकाळी जागतिक व्यापाराचे केंद्र
असलेले बगदाद दहशतवादाने होरपळल्याने
या यादीत अखेरच्या स्थानावर आहे.

भारतीय कलाकाराला फ्रान्सचा
नाइटहूड सन्मान :
•आयुष्यभर कलेचा प्रसार करत असल्याबद्दल
एका भारतीय वंशाच्या कलाकाराला
फ्रान्स सरकारने नाइटहूड हा किताब देऊन
त्याचा सन्मान केला आहे.
•दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या इस्माईल
महंमद यांचा फ्रेंच राजदूताने 'नाइट ऑफ द
ऑर्डर ऑफ आर्टस अँड लिटरेचर' हा किताब
दिला.
•फ्रान्सने केलेल्या सन्मानाबद्दल इस्माईल
यांनी आभार मानले असून, कलेची
राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसनेच
हा गौरव केल्याची भावना व्यक्त केली
आहे.
•फ्रान्स सरकारकडून 1957 पासून हा
किताब दिला जात आहे.
कला आणि साहित्याद्वारे फ्रान्सच्या
संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या
कलाकारांना हा किताब दिला जातो.
•अनेक सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन करत
असलेल्या इस्माईल महंमद यांना आधीही
अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ते

नाट्यलेखकही आहेत.
अत्यंत महत्वाचे असे 16,000 मराठी प्रश्न डाऊनलोड करा व इतरांशी शेअर करा...

अत्यंत महत्वाचे असे 16,000 मराठी प्रश्न डाऊनलोड करा व इतरांशी शेअर करा...

अत्यंत महत्वाचे
असे 16,000 मराठी प्रश्न
डाऊनलोड करा
व इतरांशी शेअर करा...


> For Download Click Here <